आंतरराष्ट्रीय घडामोडी
- संयुक्त राष्ट्र मानवी अधिकार प्रमुख:श्रीलंकेची वाटचाल हुकुमशाही कडे.
३० वर्षाच्या युद्धा नंतर चाललेली मदतकार्याची स्थिती व अंतर्गत स्थितीचे
अवलोकन करण्यासाठी नवी पिल्लं यांनी जाफना व इथर युद्ध सदृश भागास भेट दिली.नवीन
लोकशाही ,सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याची संधी असणाऱ्या श्रीलंकेची अंतर्गत
स्थिती पाहून त्यांनी हे विधान केले.
- इजिप्तची घटनेमध्ये दुरुस्ती साठी ५० सदस्यांची समिती स्थापन.
२०१२ मधील रद्द करण्यात आलेल्या घटने मध्ये योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी
राष्ट्रपतींच्या सहमतीने ५० सदसीय समितीची स्थापन करण्यात आली आहे.जी समिती न्याय
व्यवस्था,शिक्षण,प्रसार मध्यम,धार्मिक सांगतना या सारख्या सर्व क्षेत्रातील
लोकांच्या समावेशा नि बनलेली आहे.६० दिवसांचा समय या समिती ला देण्यात आला आहे.
- भारत-कोरिया वार्ता संपन्न
३ री भारत- कोरिया बातचीत सेउल येथे संप्प्न्न झाली.उर्जा,संरक्षण,अवकाश
संशोधन,सांस्कृतिक आदानप्रदान यांचा या बात्चीती मध्ये समावेश होता.तसेच
संयुक्तरीत्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी वरती सुद्धा या मध्ये चर्चा
झाली.पुढील ४ ठी चर्चेची फेरी नवी दिल्ली येथे संप्पान्न होईल.
- मोरीशस च्या उद्योग मंत्र्यंची भारतास भेट.
केंद्रीय मंत्री के.ह.मुनियाप्पा यांच्या बरोबर झालेल्या भेटी मध्ये मोरीशास
च्या मंत्र्यांनी व त्यांच्या बरोबर आलेल्या शिष्ट मंडळांनी लघु व मध्यम
क्षेत्रातील उद्योगाबाबाताचे संयुक्त सहकार्य,निरनिराळ्या दोन्ही देशांच्या
सहकार्याने निर्माण होणार्या संधी व त्या साठीचे प्रयत्न या बाबत चर्चा केली.
- सिरीया मध्ये कमीत कमी शस्त्रांचा उपयोग करावा.
सिरीया मध्ये चालू असलेल्या रक्त पटाच्या पार्श्व भूमीवर कमीतकमी
शास्त्रास्तांचा उपयोग असद च्या राजवटी विरुद्ध करावा असा निर्णय अमेरिकेच्या अंतर
राष्ट्रीय संबंध वरील समितीने घेतला.अशी परवानगी त्यांनी अमेरिकन अध्यक्ष बराक
ओबामा यांना दिली.
- संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यवर्ती बँकेचा भारतीय चालना बाबतचा फतवा
येथील मध्यवर्ती बंकेनी सर्व बँकांना आपल्या मर्यादेत राहूनच भारतीय चलना
बाबतचा व्यवहार करण्याचा आदेश दिला आहे.त्यांनी भारतीय चलनाच्या व्यावाहारावार्ती
सुद्धा बंधन घातले असून ठराविक रक्कम च देशातून बाहेर अथवा देशात गेऊन जाता येणार
आहे.
- भारतीय व्यापार धोरण बाबत अमेरिकेची चौकशीची घोषणा
भारताचा अंतर राष्ट्रीय
व्यापारातील महत्वाचा भागीदार असलेल्या अमेरिकेने भारताबाबतच्या व्यापारनीती बाबत
चौकशी करण्याचे ठरविले आहे. Trade, Investment and
Industrial Policies in India: Effects on the U.S. Economy.असे त्याचे नाव असून त्याबाबत भारता मध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे.
- भारताची भूतानला रु.५००० करोड ची मदत.
भूतान प्रधानमंत्र्यांची ६
दिवशीय भेटी मध्ये भारताने रु.५००० करोड ची मदत त्या देशास जाहीर केली.तसेच भूतान
१०००० मे.वाट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प बाबतही आपली जबाबदारी भारताने मान्य
केली.या मध्ये रु.५०० करोड च्या आर्थिक प्रोत्साहन पकेज चा सुद्धा समावेश आहे.
राजवर्धन जाधव
rajwardhan2151@gmail.com