Tuesday, 1 October 2013

SCO in Marathi

शंघाई सहयोग संगठन (Shanghai Cooperation Organization) 

शांघाई सहयोग संघटन हि सहा देशांची मिळून एक संघटना आहे, जी युरो-आशियाई देशामध्ये सुरक्षा व आर्थिक सहकार्य या वरती विशेष लक्ष पुरविते. शंघाई सहयोग संघटना   हि चीन द्वारा १९९६ मध्ये बनविली गेलेली असून  व शांघाई ५ या नावानी ओळखली जाते. हि संघटना स्थापन होण्या पाठीमागील महत्व पूर्ण उद्देश हा कि,चीन चे शेजारील देशाबरोबर असणारे भेदभाव मिटवण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मतभेद हाताळणे हे होय.

Ø स्थापना: - 26 एप्रिल १९९६
Ø मुख्य कार्यालय:- भेइजिङ्ग (Beijing), चीन

शांघाई सहयोग सांगतानासध्य स्थिती.

                २००१ मध्ये झालेल्या शांघाई शिखर बैठकी मध्ये रशिया, चीन, किर्गीस गणराज्य काझाकीस्थान,उझाबेकीस्थान यांच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत या संघटनेची घोषणा करण्यात आली.२००५ मध्ये कझाकिस्तान येथील शिखर बैठकी दरम्यान भारत,इराण व पाकिस्तान ला प्रेक्षक म्हणून सामील करण्यात आले.पुढे मंगोलिया सुद्धा प्रेक्षक म्हणून सामावून गेण्यात आले.तर बेलारूस व श्रीलंकेला वार्ता भागीदार म्हणून सहभागी करण्यात आले.तुर्क्मेनिस्थान यामध्ये विशेष आमंत्रित म्हणून भाग घेत आहे तर तुर्की सुद्धा वार्ता भागीदार म्हणून कार्यरत आहे.२०१२ च्या बीजिंग येथे झालेल्या शिखर परिषदेत अफगाणिस्थान ला प्रेक्षक म्हणून सहभागी करण्यात आले.

या संघटने मध्ये राष्ट्राध्यक्ष परिषद हि सर्वोच्च संस्था आहे जिचे सर्व निर्णय हे सर्वोच्च व अंतिम असतात.ह्यांची बैठक दरवर्षी घेतली जाते.या वेळी हि बैठक १३ सेप्तेम्बेर २०१३ ला किर्गीझास्थान मध्ये झाली आहे.

शांघाई सहयोग सांगताना व भारत.

२००५ पासून प्रेक्षक म्हणून भारत याचा एक प्रमुख घटक बनलेला आहे.त्याच बरोबर भारताला यामध्ये मंत्री स्थरा वरती सहभाग नोंदविता आला आहे. विशेषत: भारतीय विदेश मंत्री यामध्ये सहभाग नोंदवताना दिसतात.फक्त २००९ मध्ये रशिया येथील येकातेरीनबर्ग येथे झालेल्या बैठकी मध्ये पंत प्रधान मनमोहन सिंग यांनी सहभाग नोंदविला होता.

२००५ पासून भारत यामध्ये सर्व स्तरावरती सक्रीय सहभाग नोंदवत आला आहे.यामध्ये शांघाई सहयोग संगत्नेचे, उर्जा मंच,व्यापार,परिवहन,संस्कृती,अंतर्गत सुरक्षा,आपत्कालीन स्थिती व व्यवस्थापन ,व्यवसाय मंच या सर्वांचा समावेश आहे.भारतच या संघटनेतील विशेष योगदान म्हटले तर ताश्कंद मधील क्षेत्रीय काउंटर एंटी टेरीरिज्मृ स्ट्र्क्चर (आरसीटीएस/आरएटीएस) या बाबतीत राहिले आहे.
  
 या संघटनेच्या सहय्यानी खालील काही भारतासाठी अत्यंत महत्वाच्या क्षेत्रामध्ये या व्यासपिता वरती चर्चा होते. ती पुढील प्रमाणे

१.अफगाणिस्थान मधील सुरक्षा स्थितीचा विचार करणे व त्यावरील उपाययोजना.
२.मध्य-आशिया मध्ये शांतता-सहकार्य व विकास
३.युरोशियाई क्षेत्र बरोबर सहकार्य मध्ये वाढ
४.आतंकवाद बाबतची चर्चा तसेच नार्को पाधार्थ आणि तत्सम व्यापार
५.उर्जा सहयोग
६.आर्थिक संधी व गुंतवणूक क्षेत्र मध्ये वृद्धी    

TO BE Continued…….

Rajvardhan Jadhav 

Author