नशनल
एरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA)
स्थापना : २९
जुलै १९५८
पूर्वीचे नाव: एनएसीए (1915–1958)
अधिकार क्षेत्र: अमेरिकी सरकार
मुख्यालय: वाशिंगटन डी सी
संस्था कार्यपालकगण: चार्ल्स बोल्डेन,
प्रबंधक- लोरी गार्वर, डेप्युटी प्रबंधक
नशनल एरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस
एडमिनिस्ट्रेशन किंवा ज्याला संक्षिप्तपणे नासा असे म्हणतात हि संयुक्त राज्य अमेरिका सरकारची
संस्था आहे, जी देशातील सार्वजनिक अंतरिक्ष कार्यक्रम व एरोनॉटिक्स व एरोस्पेस
संशोधनसाठी जबाबदार आहे. फेब्रुवारी २००६ पासून नासाचे लक्ष्य वाक्य
"भविष्यामध्ये अंतरिक्ष
अन्वेषण, वैज्ञानिक आणि
एरोनॉटिक्स संशोधनाला चालना देणे” आहे. १४ सप्टेंबर २०११ ला नसणे घोषणा
केली कि त्यांनी एका नवीन स्पेस लॉन्च सिस्टम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे,
ज्यामुळे अंतरिक्ष यात्री अंतरिक्षात दूरपर्यंत प्रवास करु शकतील आणि ते
अमेरिकेकडून उचले घेलेले मोठे पूल होय.
नासाची नैशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस अधिनियम अंतर्गत स्थापना २९ जुलै १९५८ ला पूर्वाधिकारी
संस्था नैशनल एडवाइज़री कमिटी फॉर एरोनॉटिक्स (एनसीए)च्या जागी केली गेली. या
संस्थाने १ ऑक्टोंबर १९५८ पासून कार्यास सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत
अमेरिकी अंतरिक्ष अन्वेषण यांचे सर्व कार्यक्रम नासा कडून राबवले गेले आहेत,
ज्यामध्ये अपोलो चन्द्रमा अभियान, स्कायलैब अंतरिक्ष स्टेशन आणि
नंतर अंतरिक्ष शटल सुद्धा सामील आहे. वर्तमांनमध्ये अंतर्राष्ट्रीय
अंतरिक्ष स्टेशन यासाठी काम करीत आहे आणि ओरायन
बहु-उपयोगी कर्मीदल वाहन व व्यापारिक कर्मीदल वाहन याच्या निर्मिती व विकासावर काम
करीत आहे. संस्था लॉन्च सेवा कार्यक्रम (एलएसपी) यासाठी सुद्धा जबाबदार आहे, जे
लॉन्च व नासाचा मानवविरहित लॉन्चच्या उलटी मोजनीवर लक्ष्य ठेवते.
लेखक
राजवर्धन जाधव