यशवंतराव ते पृथ्वीराज : महाराष्ट्राचे थोर नेते (एक दृस्तीक्षेप)
भारतातील सर्वात प्रगत राज्य म्हणून ज्याचा उल्लेख आपण करतो
त्या महाराष्ट्राच्या कारभाराची धुरा ज्यांनी समर्थपणे सांभाळली अशा ह्या थोर नेत्यांना मनाचा मुजरा. ह्या थोर व्यक्तिमत्वांची
अर्थात मुख्यमंत्र्यांची व त्यांच्या कार्याची ओळख करून द्यायचा हा
अल्पसा प्रयत्न. १९४७ साली जेव्हां आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्वप्रथम
"सयुंक्त महाराष्ट्र समिती " ने मराठी भाषक हे एकत्र एका भूमीवर यावेत याची
मागणी केली व त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समितीचे कार्यभार स्वीकारून सर्व कामकाज
स्वतः पहिले. अशा प्रकारे "नागपूर करार" अंतर्गत मुंबई, दक्खन आणि विदर्भ
व बेरार ह्यांचे मिळून सावंत्र महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली.
१.स्व.यशवंतराव चव्हाण: महाराष्ट्राचे शिल्पकार हि उपाधी
स्व.चव्हाण साहेबांच्या पाटीमागे लागली आणि तीच सर्व काही साहेबांचे कार्य सांगून
जाते.मुंबई राज्यातील मंत्री तसेच मुख्यमंत्री व संयुक्त महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री ते उपपंतप्रधान अशी कारकीर्द असलेला हा नेता.कोयना,उजनी,नाशिक येथील
विमान निर्मिती कारखाना ते पंचायत राज,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मोफत
शिक्षण या सारख्या निर्णयाचे प्रणेते समजले जातात.सांस्कृतिक क्षेत्र मध्ये विशेष रुची असणारा नेता अशी त्यांची ओळख. मराठी भाषेला राजभाषेचा निर्णय त्यांनीच घेतला.
२.स्व.मारोतराव कन्नमवार: हिमालयाच्या मदतीला सह्याद्री
धावुनी गेला.चीन विरुद्धच्या युद्धानतर स्व.चावण साहेब केद्रात संरक्षण मंत्री
झाले व महाराष्ट्राची जबाबदारी मारोतराव कन्नमवार यांनी सांभाळली.अत्यंत अल्पकाळ या पदावार्ती राहून
सुद्धा कापूस एकाधिकार योजना हि आपले सहकारी स्व.यशवंतराव मोहिते यांच्या सहय्यानी
लागू केली.तसेच भंडारा-भद्रावती येथील संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्प व वर उल्लेखलेला
ओझर येथील विमान निर्मिती कारखाना स्व.चव्हाण साहेब संरक्षण मंत्री असताना यांनी
कार्यान्वित केले.मुख्यमंत्री पदावरती असताना त्यांचे निधन झाले .
३.स्व.वसंतराव नाईक:सर्वात “long
inning” चा मुख्यमंत्री.कन्नमवारांच्या अकाली
निधनानंतर मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले नाईक साहेब सलग १२ वर्ष या पदावार्ती विराजमान होते.याच
काळामध्ये सर्वात मोठा १९७२ चा दुष्काळ,स्व.मृणाल गोरे
यांच्या नेतृत्वाखालील १ लाख महिलांचा मंत्रालायावरील लाटन मोर्चा व आंदोलन हे
कसोटीचे क्षण होते.तसेच कापूस एकाधिकार योजना भात व ज्वारी साठी लागू करणे,धवलक्रांती,कृषी
विद्यापीठ निर्मिती, कमाल जमीन धारणा कायद्याची अमलबजावणी व
लोटरी सुरु करण्याचा निर्णय हे महत्वपूर्ण निर्णय गेतले.यांच्या कार्यकाळात राज्य
अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाले.
४.स्व.शंकरराव चव्हाण:सर्वात शिस्तप्रिय मुख्यमंत्री म्हणून
ज्यांचा आदरणी उल्लेख केला जातो असे चौथे मुख्यमंत्री म्हणून स्व.शंकरराव चव्हाण
यांचा उल्लेख केला जातो.प्रशासकीय शिस्त व त्यात अमुलाग्र बदल,आदिवासींना जमिनी
परत करणे,केंद्राच्या २० कलमी योजनाची अमलबजावणी ते
जायकवाडी,विष्णुपुरी,पूर्ण-पैनगंगा,अप्पर मांजरा प्रकल्प राबवणे हि महत्व पूर्ण
कार्ये यांनी केली.तसेच केद्रामध्ये सुद्धा संरक्षण,गृह,परराष्ट्र मंत्रालय,अर्थ
हि खाती तसेच योजना आयोगाचे उपाध्यक्ष हि ते होते.
५.स्व.पद्मभूषण वसंतदादा पाटील.: महाराष्ट्राचे भाग्यविधाते-हरित
क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते.मुख्यमंत्री म्हणून कमी पण
महाराष्ट्रातील घरापर्यंत पोहचलेला सर्वसामान्य जनतेचा नेता अर्थात सर्वांचे दादा
म्हणून सुपरिचित.भारतातील
सर्वात मोठे ‘मास लीडर’ म्हणून त्यांना ओळखले जाते.महाराष्ट्रातील
प्रत्येक सहकारी संस्थेच्या उभारणीत यांचा मोलाचा वाटा आहे.सहकार,पाठबंधारे,कृषी-औद्योगिक धोरण ते विनाअनुदानित शिक्षण संस्थाना परवानगी,डेक्कन शुगर
इस्तीतुत (आताची वसंतदादा शुगर इंस्तीतुत) ची स्थापना,कुरनूर-चांदोली
या सारखे शेकडो पाठबंधारे प्रकल्प अशी काही यांची महत्वाची
कार्ये.त्यांना पद्मभूषण व पुणे विद्यापीठाकडून D.Lit पदवी सहकारातील व पाटबंधारेतील
कार्याबद्दल बहाल करण्यात आली आहे.
६.शरद पवार : महाराष्ट्राच्या
राजकीय-आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रावरती गेली ५ दशके प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
प्रभाव असणारा नेता व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वात तरुणपनि म्हणजे वयाच्या
३८ व्या वर्षी भूषविले.क्रीडा विभागाकडे लक्ष,महिलाविषयक धोरण,गळीत हंगाम काळ
निश्चिती, ते शेती माल प्रक्रिया प्रकल्प,कृषी संशोधन,औद्योगिक धोरणाला आधुनिक
चेहरा असे निर्णय त्यांनी
गेतले.सामाजिक दृष्ट्या संवेदनशील या नेतृत्वाने मराठवाडा विद्यापीठाचे बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतरण करून दाखविले.सध्या ते केंद्रात कृषी
मंत्री म्हणून कार्य पाहतात व या अगोदर संरक्षण,विरोधी पक्ष नेता या जबाबदार्या हि
त्यांनी केंद्रात समर्थपाने सांभाळल्या आहेत.
७.स्व. बी.के.सावंत. मारोतराव कन्नमवार यांच्या अकाली निधना नंतर महाराष्ट्राचे
पहिले हंगामी-औत घटकेचे मुख्यमंत्री म्हणजेच बी.के. तथा
बाळासाहेब सावंत हे होत.त्यांचा कार्यकाल फक्त ९ दिवसांचा होता.सध्या दापोली येथे
स्थापित असलेले कृषी विद्यापीठ त्यांच्या नावानी ओळखले जाते.
To be continued…….
राजवर्धन जाधव Author (rajwardhan2151@gmail.com)
Edited by- Vaibhav Pramod Rajdeep